Struggling to prove himself alive; Dead shown in government records

एखाद्या जिवंत माणसाला मृत घोषित करून अथवा त्याचा मृत्यू झाला हे दाखवून त्याची जमीन बळाकावली जाते, त्याचा पैसा लुटला जातो. तसेच काही वेळा महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून एखादी व्यक्ती अस्तित्वात असतानाही तिला मृत दाखविले जाते, अशा कथा आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहतो. परंतु अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. एका व्यक्तीला आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. अशोक नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत. कारण सरकारी कागदपत्रांवर त्याला मृत घोषित करण्यात आले आहे.

    दिल्ली : एखाद्या जिवंत माणसाला मृत घोषित करून अथवा त्याचा मृत्यू झाला हे दाखवून त्याची जमीन बळाकावली जाते, त्याचा पैसा लुटला जातो. तसेच काही वेळा महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून एखादी व्यक्ती अस्तित्वात असतानाही तिला मृत दाखविले जाते, अशा कथा आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहतो. परंतु अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. एका व्यक्तीला आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. अशोक नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत. कारण सरकारी कागदपत्रांवर त्याला मृत घोषित करण्यात आले आहे.

    काय आहे प्रकरण?

    शिवकुमार अहिरवार असे या व्यक्तीचे नाव असून तो गेल्या दोन महिन्यांपासून अधिकाऱ्यांकडे जाऊन आपण जिवंत असल्याचे वारंवार सांगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मजुरीचे काम करणाऱ्या शिवकुमारने 2018 साली राज्य सरकारच्या मुख्यमंत्री जनकल्याण संबल योजनेत आपले नाव नोंदवले होते. या योजनेद्वारा सरकार असंघटित क्षेत्राच्या उन्नतीसाठी आर्थिक मदत करते. या योजनेद्वारा मुलांच्या पालन-पोषणासाठी, मृत्यूनंतर आर्थिक सहाय्य करते.

    सरकारी नोंदीमध्ये दाखविले मृत

    शिवकुमारला या योजनेमधून 2018 साली मुलगा झाल्यानंतर 18 हजार रुपये मिळाले होते. पण या वर्षी मार्च महिन्यात मुलगी जन्माला आल्यानंतर तो सरकारी कार्यालयात गेला तेव्हा त्याला कागदपत्रांवर मृत घोषित केले असल्याचे समजले. सरकारी नोंदींमध्ये 2019 साली त्याला मृत घोषित करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असे शिवकुमारने सांगितले. त्यानंतर त्याने तिथे उपस्थित असलेल्या लोकांना आपण जिवंत असल्याचे समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणीही त्याचे ऐकले नाही. ही चूक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुरुस्त करावी लागेल त्यानंतर योजनेचा लाभ मिळू शकतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले.