Such a time should not come upon the enemy; Rakhi tied by sisters tied on brother's body

चिंतापल्ली लक्ष्मैया असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने चिंतापल्ली यांच्या पाच बहिणी शनिवारी सायंकाळी चिंतापल्ली यांच्या घरी आल्या होत्या. मात्र, रविवारी रक्षाबंधनच्या दिवशीच चिंतापल्ली याची प्रकृती अचानक बिघडली. चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले.

    नलगोंडा : बहिण भावाच्या प्रमाचं अतूट नातं जपणारा सण म्हणजे रक्षा बंधन. या दिवशी बहिणी आपल्या भावच्या हातावर राखी बांधून हा सण साजरा करतात. मात्र, तेलंगणामधील (Telangana) नलगोंडामधून (Nalgonda) येथे रक्षाबंधन (Raksha Bandhan) दिवशी घडलेली घटना काळजाचं पाणी पाणी करणारी आहे. बहिणींना आपल्या भावाच्या मृतदेहाला बांधवी लागली आहे.

    चिंतापल्ली लक्ष्मैया असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने चिंतापल्ली यांच्या पाच बहिणी शनिवारी सायंकाळी चिंतापल्ली यांच्या घरी आल्या होत्या. मात्र, रविवारी रक्षाबंधनच्या दिवशीच चिंतापल्ली याची प्रकृती अचानक बिघडली. चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले.

    हातावर राखी बांधण्याआधीच भावाचा मृत्यू झाल्याने सर्व बहिणींना मोठा धक्का बसला. संपूर्ण घरावरचं दुख:चा डोंगर कोसळला. हसत्या खेळत्या घरातून भावाची प्रेतयात्रा निघाली. भावाला अखेरचा निरोप देताना सर्व बहिणींनी भावाच्या मृतदेहावर राखी बांधली. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.