Thaman of mysterious fever in Uttar Pradesh; Sensation of 100 deaths

उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यात वेगळाच धोका निर्माण झाला आहे. देशातील सर्वांत मागास जिल्ह्यांपैकी एक असलेल्या फतेहपूरमध्ये 'रहस्यमय ताप' डोकेदुखी ठरत आहे. यमुनेच्या किनाऱ्यावर असलेल्या ललौली गावात गेल्या महिन्याभरात यामुळे 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

    फतेहपूर : उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यात वेगळाच धोका निर्माण झाला आहे. देशातील सर्वांत मागास जिल्ह्यांपैकी एक असलेल्या फतेहपूरमध्ये ‘रहस्यमय ताप’ डोकेदुखी ठरत आहे. यमुनेच्या किनाऱ्यावर असलेल्या ललौली गावात गेल्या महिन्याभरात यामुळे 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

    रहस्यमय तापामुळे दगावलेल्या 100 पेक्षा अधिक जणांना गावातील 10 कब्रस्तानांमध्ये दफन करण्यात आले. ताप आणि श्वास फुलल्यामुळे ग्रामस्थांचा मृत्यू होत असल्याने स्थानिकांनी सांगितले. यापैकी कोणालाही उपचार मिळाले नाहीत. 23 एप्रिलला गावात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली.

    या दिवशी 7 जणांचा रहस्यमय तापामुळे मृत्यू झाला. फतेहपूर जिल्ह्यात 26 एप्रिलला पंचायत निवडणुकीचे मतदान पार पडले. जिल्ह्यातल्या इतर भागांतही प्रचारासोबत प्रादुर्भावदेखील वाढत होता. जिल्हा मुख्यालयापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या बांदा हायवेच्या कडेला असलेल्या ललौली गावातील अनेकांना थंडी, ताप आणि श्वासोच्छवासात अडचणी जाणवू लागल्या.