Excitement over the discovery of unidentified bodies under the Raita river bridge sj

मध्यप्रदेशातील इंदौर मधील एका बड्या रुग्णालयातील शवागृहातील धक्कादायक प्रकार उघजकीस आला आहे. या शवागृहात काम करणारा एक कर्मचारी रात्रीच्या वेळेस शवागृहातच अय्याशी करत होता. याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झालेत.

    इंदौर : मध्यप्रदेशातील इंदौर मधील एका बड्या रुग्णालयातील शवागृहातील धक्कादायक प्रकार उघजकीस आला आहे. या शवागृहात काम करणारा एक कर्मचारी रात्रीच्या वेळेस शवागृहातच अय्याशी करत होता. याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झालेत.

    महाराजा यशवंतराव रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. हे रुग्णालय इंदौर मधील सर्वात मोठ रुग्णालय आहे. या शवगृहाच्या देखरेखीचे काम एका खाजगी कंपनीकडे देण्यात आले आहे. रात्रीच्या येथील कर्मचारी बाहेरुन मुलींना शवागृहात बोलवायचे. यानंतर रात्रभर येथे कर्मचारी मुलींसह अय्याशी करायचे.

    मंगळवारी हा प्रकार उघडकीस आले. काही लोक मृतदेह घेऊन शवगृहात आले होते. यावेळी हे कर्मचारी मुलींसह विचित्र अवस्थेत दिसले. त्यांनी याबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

    या नंतर याची तक्रार थेट रुग्णालय व्यवस्थापनाकडे गेली. यानंतर या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून शवगृहाचा ठेका असलेल्या कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे.