सीबीआयचे माजी संचालक आणि माजी राज्यपाल अश्वनी कुमार यांची सुसाईड नोट.. या कारणांसाठी केली आत्महत्या

मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे. अश्विनीकुमार (former CBI director and former governor Ashwini Kumar) यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी आत्महत्या केली, त्यांच्या अशा निधनाने राजकीय आणि उच्चभ्रू वर्तुळात खळबळ उडाली आहे. आजारीपण आणि विकलांगतेमुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या चिठ्ठीत लिहून ठेवले आहे

 शिमला : मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक (Former Governor of Manipur and Nagaland, and Ex-CBI Director ) यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे. अश्वनीकुमार (former CBI director and former governor Ashwani Kumar) यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी आत्महत्या केली, त्यांच्या अशा निधनाने राजकीय आणि उच्चभ्रू वर्तुळात खळबळ उडाली आहे. आजारीपण आणि विकलांगतेमुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

हिमाचल प्रदेशाचे पोलीस महासंचालक संजय कुंडू यांनी सांगितले की, ‘आम्हाला एक सुसाईट नोट मिळाली आहे. ज्यात अश्वनीकुमार यांनी लिहिले आहे की, स्वत:च्या इच्छेनुसार आजारपण आणि विकलांगपणाला कंटाळून जीवन संपवित आहे. आपला आत्मा नव्या प्रवासाला निघाला आहे. त्यामुळे कुणी दु:ख करुन घेऊ नये. मृत्यूपश्चात कोणतेही समारोह करु नये ’ असे त्यांनी चिठ्ठीत लिहिल्याची माहिती दिली आहे. अश्वनीकुमार यांचा मृतदेह  फाशी घेतलेल्या अवस्थेत त्यांच्या मुलाने आणि सुनेने पाहिल्याचेही कुंडू यांनी सांगितले. अश्वनीकुमार दररोज संध्याकाळी सातच्या सुमारास दरवाजा उघडा ठेवून ध्यानधारणा करीत असत. सात ऑक्टोबरला संध्याकाळी त्यांचा मुलगा आणि सून बाहेर फिरायला निघाले असताना, त्यांना सर्व दरवाजे बंद असल्याचे दिसले. दरवाजे तोडण्यात आल्यानंतर कुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. गळ्यातील दोरी तोडून त्यांनी मृतदेह जमिनीवर ठेवला. फॉरेन्सिंक टीमने घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली.

पोलिसांकडून परिवारातील सदस्यांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. या प्रकरणात काही संशयास्पद असल्याचे परिवारातील सदस्यांना वाटत नसल्याचेही पोलीस महासंचालकांनी स्पष्ट केले. दुपारी सर्व परिवाराने एकत्र जेवण घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कुमार हे हिमाचल प्रदेश आणि केंद्र सरकारच्या सेवेत ३७ वर्षे होते. १९७३ मध्ये पोलीस दलात सामील झालेल्या कुमार यांना २००६ साली हिमाचल प्रदेशाच्या पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर दोन वर्षांनी सीबीआय संचालकपदाचा कार्यभार सांभाळला होता. मार्च २०१३ मध्ये त्यांनी नागालँडचे राज्यपालपद सांभाळले, त्यानंतर जुलै २०१३ मध्येच त्यांनी मणिपूरच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभळला.