sultan bull

हरयाणाच्या (Haryana) सुल्तान रेड्याचा(sultan-bull)  हृदयविकाराच्या (heart attack) झटक्याने मृत्यू झाला आहे. कैथल जिल्ह्यातल्या (Kaithal district) बुडाखेडा गावात सुल्तानने अखेरचा श्वास घेतला.

    हरयाणा: कोट्यवधींची बोली लागलेल्या हरयाणाच्या (Haryana) सुल्तान रेड्याचा(sultan-bull)  हृदयविकाराच्या (heart attack) झटक्याने मृत्यू झाला आहे. कैथल जिल्ह्यातल्या (Kaithal district) बुडाखेडा गावात सुल्तानने अखेरचा श्वास घेतला. सुल्तानच्या मृत्यूमुळे संपूर्ण गाव दु:खी झाला आहे.

    सुल्तानचे मालक नरेश यांना सुल्तानच्या मृत्यूचे खूप दु:ख झाले आहे. कारण त्याला त्यांनी राजेशाही थाटात वाढवलं. त्याच्या शरीरयष्टीच्या कहाण्या याच बुडाखेडा गावातून जगभर पोहचल्या. सुल्तानने अनेक प्रदर्शनात लाखोंची बक्षीसं पटकावली.  या रेड्यामुळेच नरेश यांना सर्वत्र ओळख मिळाली, मात्र आता सुल्तान गेल्याने त्यांना कुटुंबातील एक सदस्यच गेल्याचं दु:ख होत आहे.

    सुल्तानचे मालक नरेश यांनी सुल्तानला रोहतकमधून २ लाख ४० हजार रुपयांना खरेदी केले होते. लहान असल्यापासूनच त्यांनी सुल्तानची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेतली. सुल्तान गेल्याचं दु:ख त्यांच्यासाठी मोठं आहे, सुल्तान गेल्यानंतर आणखी एक रेडा घेऊन त्याला मोठं करु, पण सुल्तानची जागा कुणीही घेऊ शकत नाही असं नरेश सांगतात.


    राजस्थानातल्या पुष्करच्या जत्रेत सुल्तानवर २१ कोटींची बोलीही लागली. मात्र, मुलाप्रमाणे वाढवलेल्या सुल्तानला विकण्याची तयारी नरेश यांची नव्हती. त्यामुळेच त्यांनी ती बोली नाकारली.

    सुल्तानला नरेश हे नेहमी प्राण्यांच्या प्रदर्शनात घेऊन जायचे. त्याची शरीरयष्टी आणि ठेप पाहिल्यानंतर कुणीही त्याला बक्षीस नाकारु शकत नव्हतं. त्यामुळे नरेश आणि त्यांच्या कुटुंबाला एक वेगळी ओळख मिळाली. हेच नाही तर सुल्तान हा सोशल स्टारही झाला होता. एका म्युझिक अल्बमध्ये सुल्तान दिसला होता.