Sultan dies of Rs 21 crore bid; Big shock to owner Beniwal

पंजाबमधील एका रेड्याची काही महिन्यांपूर्वी चांगलीच चर्चा रंगली होती. मर्सिडीज कारच्या किंमतीपेक्षाही हा महागडा रेडा पशुमेळाव्यात सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. हरयाणातील कैथल जिल्ह्यातील या रेड्याचा थाटच वेगळा होता. सुल्तानमुळे जगभरात त्याचे आणि त्याच्या मालकाचे नाव प्रसिद्धीझोतात आले होते. 21 कोटी रुपयांची बोली लागलेल्या या रेड्याने आज अखेरचा श्वास घेतला.

    चंदीगड : पंजाबमधील एका रेड्याची काही महिन्यांपूर्वी चांगलीच चर्चा रंगली होती. मर्सिडीज कारच्या किंमतीपेक्षाही हा महागडा रेडा पशुमेळाव्यात सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. हरयाणातील कैथल जिल्ह्यातील या रेड्याचा थाटच वेगळा होता. सुल्तानमुळे जगभरात त्याचे आणि त्याच्या मालकाचे नाव प्रसिद्धीझोतात आले होते. 21 कोटी रुपयांची बोली लागलेल्या या रेड्याने आज अखेरचा श्वास घेतला.

    ह्रदविकाराच्या झटक्याने सुल्तानचे निधन झाले आहे. सुल्तानने वयाच्या 14 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सुल्तानच्या जाण्याचे दुःख इतके मोठे आहे की, हरयाणाच्या विविध भागातून लोक बेनीवाल यांना भेटायला येत आहेत. सुल्तानच्या माध्यमातून या रेड्याचे मालक नरेश बेनीवाल लाखो रुपयांची कमाई करत होता. नरेश बेनीवाल म्हणाले की, सुल्तानसारखा कोणीही नव्हता आणि कदाचित पुढेही कोणीही नसेल. सुलतानमुळेच बेनीवाल यांना एक विशेष ओळख मिळाली होती.

    वर्षाला होती 90 लाख रुपयांची कमाई

    सुल्तानचे वीर्य देशभरात लाखो रुपयांना विकले जात होते. सुलतान हजारो वीर्याचे डोस देत होता, जे प्रति डोस 300 रुपयांना विकले जायचे. त्यामुळे, उत्पन्नाच्या बाबतीतही सुल्तानचं महत्त्व आणि वेगळीच ओळख होती. सुल्तानच्या माध्यमातून त्याचा मालक वर्षाला अंदाजे 90 लाख रुपये कमवायचा. 2013 मध्ये झज्जर, कर्नाल आणि हिसार येथे झालेल्या राष्ट्रीय पशु सौंदर्य स्पर्धेत सुलतान राष्ट्रीय विजेता ठरला होता. एका प्रदर्शनामध्ये सुल्तानसाठी तब्बल 21 कोटी रुपयांची बोली लागली होती. मात्र, त्याच्या मालकाने त्याला विकण्यास नकार दिला. सुल्तानचे मालक त्याच्यावर जीवापाड प्रेम करत, तो त्यांचा लाडका होता. त्यामुळेच, त्याच्या आहारातही मालकाने कधी कमतरता दाखवली नाही.
    असा होता सुल्तानचा आहार

    सुलतान अतिशय लक्झरी जीवन जगला होता. सुलतान दररोज दहा किलो दूध प्यायचा आणि सुमारे 15 किलो सफरचंद खात असे. हिवाळ्यात तो रोज दहा किलो गाजर खात असे. याशिवाय त्याच्यासाठी ड्राय फ्रूट्स आणि इतर प्रकारची उत्पादने खास तयार केली जात होती. त्याच्यासाठी केळी आणि तुपाचा डोस वेगळा दिला जायचा. सुलतानचा दैनंदिन खर्च 2000 पेक्षा जास्त होता. कधी कधी तर तो 3 ते 4 हजार रुपयांपर्यंत असायचा.