संडे व नाईट कर्फ्यु बंद; सर्व बार, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मॉल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, प्राणिसंग्रहालय उघडण्यास परवानगी

राज्यातील सर्व बार, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मॉल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, प्राणिसंग्रहालय उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु या सर्व संस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीचा एक डोस घेणे आवश्यक असणार आहे.

    चंदीगड : पंजाबमध्ये कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी लावण्यात आलेली रविवार व रात्रीची संचारबंदी संपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

    याचबरोबर राज्यातील सर्व बार, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मॉल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, प्राणिसंग्रहालय उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु या सर्व संस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीचा एक डोस घेणे आवश्यक असणार आहे.

    राज्यात आता समारोहादरम्यान इनडोअर 100 लोकांना एकत्रित येण्याची परवानगी असणार आहे. घराच्या बाहेर 200 लोकांना एकत्रित येण्यास परवानगी देण्यात आली आहे.