Sune reached the hospital with her father-in-law on her back; In the second wave of corona, the relationship with the health system is also weakened

कोरोनाबाधित सासऱ्यास पाठीवर घेऊन जाणाऱ्या आसाममधील निहारिका दासचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. निहारिकाच्या या छायाचित्राने तिचा सेवाभाव तर दर्शविलाच शिवाय हतबलताही जगजाहीर झाली आहे. सासरे कोरोनाबाधित होते आणि कोणीही मदतीस पुढे येत नसल्याचे दिसताच तीने स्वत:च सासऱ्यांना पाठीवर लादले आणि ऑटोरिक्षापर्यंत पोहोचले व तेथून ते दवाखान्यात दाखल झाले. या हतबलतेवर भाष्य करताना निहारिकाने अशी स्थिती कोणावरही येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. आसाममधील नागाव येथील निहारिकाचे सासरे थुलेश्वर हे पानसुपारी विक्रीचा व्यवसाय करतात.

  गुवाहाटी : कोरोनाबाधित सासऱ्यास पाठीवर घेऊन जाणाऱ्या आसाममधील निहारिका दासचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. निहारिकाच्या या छायाचित्राने तिचा सेवाभाव तर दर्शविलाच शिवाय हतबलताही जगजाहीर झाली आहे. सासरे कोरोनाबाधित होते आणि कोणीही मदतीस पुढे येत नसल्याचे दिसताच तीने स्वत:च सासऱ्यांना पाठीवर लादले आणि ऑटोरिक्षापर्यंत पोहोचले व तेथून ते दवाखान्यात दाखल झाले. या हतबलतेवर भाष्य करताना निहारिकाने अशी स्थिती कोणावरही येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. आसाममधील नागाव येथील निहारिकाचे सासरे थुलेश्वर हे पानसुपारी विक्रीचा व्यवसाय करतात.

  निहारिकालाही कोरोनाची लागण

  निहारिका यांचे पती सुरज कामासाठी घरापासून दूर आहे. पतीच्या गैरहजेरीत सूनबाईंनी मुलाचे कर्तव्य देखील पार पाडले. कोरोनाबाधित रुग्ण म्हटले की, सगळेच दूर पळतात. सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही, कोरोना होण्याची शक्यता वाढते. मात्र सूनबाईने धोका पत्कारून सासऱ्यांना रुग्णालयात दाखले केले. आता निहारिका यांनादेखील करोनाची लागण झाली आहे.

  संकट संपलेले नव्हतेच…

  जवळच्या रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी सासऱ्यांची गंभीर प्रकृती पाहून निहारिकाला 21 किलोमीटर अंतरावरील कोविड रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यामुळे निहारिकाला पुन्हा एक गाडी बोलवावी लागली. त्या रुग्णालयात अॅम्बुलन्स वा स्ट्रेचरचीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे निहारिकाला पुन्हा एकदा सासऱ्यांना पाठीवर घ्यावे लागले. ज्यावेळी निहारिकाची सासऱ्यांना दवाखान्यात भरती करण्याची धडपड सुरू होती त्यावेळी तिचे सासरे बेशुद्ध होते. त्यामुळे निहारिकाला बराच शारीरिक व मानसिक त्रासही सोसावा लागला. दरम्यान, निहारिका आता आयसोलेशनमध्ये आहेत. तर त्यांच्या सासऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सासऱ्यांना सोडून आपण दुसरीकडे राहणार नाही, असे म्हटल्यावर डॉक्टरांनी दोघांना भोगेश्वरी फुकानानी रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करून दिली.

  हे सुद्धा वाचा