firing

स्थानिकांच्या मदतीने जखमी सुपरवायझरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथून त्यांना अधिक चांगल्या उपचारासाठी गोरखपूर येथे हलविण्यात आले. या प्रकरणात अद्याप कोणतीही लूटमार झालेल्याची तक्रार आलेली नाही.

गोपाळगंज : ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनच्या  (Amazon company) डिलिव्हरी ऑफिसवर (delivery office)  गोळीबार झाल्याने गोपाळगंजमध्ये अशांतता पसरली आहे. गोपालगंज शहर परिसरातील साधू चौक जवळ ज्योती नगर परिसरात अमेझॉनचे वितरण केंद्र आहे. रविवारी रात्री उशिरा अज्ञात दुचाकीस्वाराने तेथे हल्ला केला आणि गोळीबार सुरू केला. त्याच घटनेत कंपनीचे सुपरवायझर (Supervisor ) पवन पांडे यांना एक गोळी लागली.

स्थानिकांच्या मदतीने जखमी सुपरवायझरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथून त्यांना अधिक चांगल्या उपचारासाठी गोरखपूर येथे हलविण्यात आले. या प्रकरणात अद्याप कोणतीही लूटमार झालेल्याची तक्रार आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, काल संध्याकाळी १ लाख ८० हजार रुपयांच्या दरोड्याच्या वेळी गोळीबार झाल्याची चर्चा सुरु आहे. परंतू पीडित तरुणाने अद्याप दरोडा टाकण्याचे कोणतेही विधान नोंदवले नाही.