robber

लॉकडाऊनमध्ये आर्थिक फटका(lockdown effect) बसल्याने अनेकांनी आपल्या व्यवसायात बदल केला. मात्र सूरतमध्ये(surat crime) एक वेगळाच प्रकार घडला आहे. एका हिरे व्यापाऱ्याने चक्क गुन्ह्याचा(crime) मार्ग अवलंबला आहे.

लॉकडाऊनमध्ये आर्थिक फटका(lockdown effect) बसल्याने अनेकांनी आपल्या व्यवसायात बदल केला. मात्र सूरतमध्ये(surat crime) एक वेगळाच प्रकार घडला आहे. एका हिरे व्यापाऱ्याने चक्क गुन्ह्याचा(crime) मार्ग अवलंबला आहे. सूरतच्या वाराच्छामधले हिरे व्यापारी उदयवीर तोमर उर्फ पप्पूकडे आपले हिरे पॉलिश करण्यासाठी द्यायचे. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हिरे व्यापारालाही उतरती कळा लागली आणि पप्पूची नियतही बिघडली.

मंदीमुळे उदयवीर तोमरने गुन्ह्याचा मार्ग अवलंबला. हिरे पोहोचवणाऱ्यांना(अंगडिया) लक्ष्य करण्यासाठी त्याने दरोडेखोरांची टोळी बनवली. मंगळवारी एका अंगडियाला लक्ष्य करण्याआधी तोमर आणि त्याच्या टोळीतील साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी या पाच जणांच्या टोळीला पकडले, तेव्हा त्यांच्याकडे देशी पिस्तुल, चाकू, हातोडा, मिरची पूड, नायलॉनची दोरी होती. मुळचा मध्य प्रदेशचा असलेला उदयवीर तोमर गेल्या ३० वर्षांपासून सूरत शहरामध्ये राहत आहे.  वारच्छा आणि कापोद्रा येथील वेगवेगळया युनिट्समध्ये त्याने हिरे पॉलिशिंगचे काम केले आहे.कालांतराने हिरे पॉलिशिंगच्या मशीन त्याने खरेदी केल्या आणि स्वत:चा व्यवसाय सुरु केला. तोमरला बऱ्यापैकी काम मिळत असल्याने तो महिन्याला ३० हजार रुपये कमवत होता.मात्र लॉकडाऊननंतर त्याच्या धंद्यावर संक्रांत आली आणि तो दरोडेखोरी करण्याच्या वाईट मार्गाला लागला.