संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यात(Surguja District) एका सर्जनने फक्त ७ तासांमध्ये तब्बल १०१ महिलांवर सर्जरी(Surgeon Done 101 Surgeries In 7 Hours) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सरकारने चौकशीचे आदेश(Inquiry) दिले आहेत.

    छत्तीसगडमध्ये(Chattisgarh) एका सरकारी नसबंदी शिबिरात(Camp) एक वेगळाच प्रकार घडला आहे. छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यात(Surguja District) एका सर्जनने फक्त ७ तासांमध्ये तब्बल १०१ महिलांवर सर्जरी(Surgeon Done 101 Surgeries In 7 Hours) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सरकारने चौकशीचे आदेश(Inquiry) दिले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी हे शिबीर पार पडलं. या शिबिरामध्ये अनागोंदी कारभार सुरु असल्याची बातमी समोर आली. यानंतर आरोग्य विभागाने याची दखल घेत सर्जन आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली. तक्रारींची दखल घेत तपास सुरु करण्यात आला आहे. तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण योजनेचे मुख्य सचिव डॉक्टर अशोक शुक्ला यांनी दिली आहे.

    डॉक्टर शुक्ला म्हणाले की,“सरकारी सर्जनने एकूण १०१ सर्जरी केल्या आहेत. ज्या महिलांवर सर्जरी करण्यात आली त्यांची स्थिती सध्या सामान्य असल्याचं सांगितलं जात आहे. पण सरकारी नियमांनुसार, सर्जन दिवसात ३० सर्जरीच करु शकतात. नियमांचं पालन का केलं नाही याची माहिती घेण्यासाठी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.”

    दरम्यान सर्जनने मोठ्या प्रमाणात महिला आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला सर्जरीसाठी विनंती केली असल्याचं म्हटलं आहे. या महिला गावांमधून आलेल्या होत्या आणि त्यांना वारंवार प्रवास करणं शक्य नव्हतं असंही त्याने म्हटलं आहे.या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.