प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये मंगळवारी पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. यानंतर दोन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलासमोर आत्मसमर्पण केले. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए- तैयबाशी संबंधित असून ते स्थानिक रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

श्रीनगर (Shrinagar).  जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये मंगळवारी पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. यानंतर दोन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलासमोर आत्मसमर्पण केले. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए- तैयबाशी संबंधित असून ते स्थानिक रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचा इशारा दिला. यासाठी त्यांनी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांचीही मदत घेतली. अखेर कुटुंबीयांच्या आवाहनानंतर दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. कुलगामच्या तोंगडौनू भागामध्ये ही चकमक घडली. हे दोघे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि काही काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याबाबत माहिती दिली.