शरण आलेल्या दहशतवाद्याने लढवली जम्मू काश्मीरमधील जिल्हा परिषदेची निवडणूक, दहशतवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून देण्याचं आवाहन

‘मी एका दहशतवादी संघटनेसाठी गेल्या ७ वर्षांपासून काम करत होतो. माझ्याकडे एका विभागाची पूर्ण जबाबदारी देण्यात आली होती. मात्र तो मार्ग चुकीचा असल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर मी बंदूक टाकून दिली. इतर दहशतवाद्यांनीही हिंसेचा मार्ग सोडून द्यावा, असं आवाहन मी करेन”, अशी प्रतिक्रिया मुनाफ मलिकनं दिलीय.

जम्मू काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या (DDC) निवडणुकांसाठीचं मतदान काल (शनिवारी) पार पडलं. या निवडणुकीत सरासरीपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली. ३७० कलम हटवल्यानंतर होणाऱ्या या निवडणुकीत मतदारांनी जोरदार प्रतिसाद देत आपला मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीत शरण आलेला एक दहशतवादीदेखील उभा होता. एकेकाळी हातात रायफल घेऊन दहशत माजवणारा मुनाफ आता तो मार्ग सोडून लोकशाही मार्गाकडे वळलाय. त्याचं नाव मुनाफ मलिक. जम्मू काश्मीरच्या दरहाल मलकन या ठिकाणाहून तो निवडणुकीसाठी उभा आहे.