swapan dasgupta

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीमध्ये(west bengal election) भाजपच्या तिकीटावर लढणारे स्वपन दासगुप्ता यांनी राज्यसभेतून राजीनामा दिला आहे.मात्र हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही.

    पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीमध्ये(west bengal election) भाजपच्या तिकीटावर लढणारे स्वपन दासगुप्ता यांनी राज्यसभेतून राजीनामा दिला आहे.मात्र हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही. तृणमूल काँग्रेसकडून स्वपन दासगुप्ता यांच्या उमेदवारी निश्चित झाली नव्हती. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी संविधानाच्या नियमांचा हवाला देत दासगुप्ता यांना ‘अपात्र’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.

    भाजपा व तृणमूल काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दरम्यान आज तृणमूल व काँग्रेसच्या विरोधानंतरही भाजपाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर करण्यात आलेल्या स्वपन दासगुप्ता यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे.
    भाजपाने स्वपन दासगुप्ता यांना तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, ज्यावर तृणमूल व काँग्रेसने आक्षेप नोंदवला होता व काही प्रश्न उपस्थित केले होते.

    भाजपाने रविवारी आणखी २६ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये स्वपन दासगुप्ता यांच्या नावाचा देखील समावेश होता.