प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मध्यप्रदेशातील होशंगाबादमधील थंड वातावरण पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असते. पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र असलेल्या पचमढीतील स्पॉट बी फॉलवर रविवारी अचानक वाघोबा अवतीर्ण झाले आणि त्यांनी पार्किंग एरियामध्ये बस्तान मांडल्याने पर्यटकांना धडकी भरली होती.

पंचमढी (Panchmadhi).  मध्यप्रदेशातील होशंगाबादमधील थंड वातावरण पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असते. पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र असलेल्या पचमढीतील स्पॉट बी फॉलवर रविवारी अचानक वाघोबा अवतीर्ण झाले आणि त्यांनी पार्किंग एरियामध्ये बस्तान मांडल्याने पर्यटकांना धडकी भरली होती.

पार्किंग स्थळी वाघोबाला पाहताच पर्यटकांची तर शुद्धच हरपली. जवळपास अर्धा तास वाघोबाने बी फॉल परिसरात फेरफटका मारला. वाघोबाला पाहताच पर्यटकांमध्ये एकच पळापळ झाली. अनेक पर्यटकांना तर वाहनांमध्येच बसून राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. जीवाच्या भीतीने पर्यटकांनी घेतला वाहनात आश्रय घेतला.

अन् पर्यटकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
पर्यटन स्थळी वाघोबा अवतीर्ण झाल्याची माहिती मिळताच सातपुडा व्याघ्र अभयारण्याचे एक पथकही बी फॉलवर दाखल झाले. जवळपास अर्धा तास या भागात वाघोबाने फेरफटका मारल्यानंतर हा वाघोबा नजरेआड झाला. वाघोबाने येथून प्रस्थान करताच पर्यटकांच्या जीवत जीव आला आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

वाघाचा शोध सुरू
दुसरीकडे, व्याघ्र अभयारण्याचे एक पथक या वाघोबाचा शोध घेत आहेत. हा वाघ नजीकच्या परिसरात असल्याच्या शक्यतेवरून त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात आहे. पर्यटनस्थळी वाघोबांची उपस्थिती दिसताच हा परिसर त्वरित रिकामा करण्यात आला. सद्यस्थितीत बी फॉलवर एन्ट्री बंद करण्यात आली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.