BJP for tamilnadu

तामिळनाडू भाजपानं प्रचारासाठी एक व्हिडिओ(Bjp trolled in tamilnadu after using congress leader`s daughter in law photo used for video) बनवला. या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची सून आणि कार्ती चिदंबरम यांची पत्नी श्रीनिधी चिदंबरम आहेत.

    चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची(tamilnadu election) तयारी जोरात सुरु आहे. येत्या ६ एप्रिलला तिथे मतदान(voting) होणार आहे. भारतीय जनता पक्षसुद्धा (BJP) पूर्ण ताकदीसह या निवडणुकीत उतरला आहे. मात्र या निवडणुकीमध्ये भाजपला एक चूक खूप महागात पडली आहे.

    तामिळनाडू भाजपानं प्रचारासाठी एक व्हिडिओ(Bjp trolled in tamilnadu after using congress leader`s daughter in law photo used for video) बनवला. या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची सून आणि कार्ती चिदंबरम यांची पत्नी श्रीनिधी चिदंबरम आहेत. एक महिला कलाकार म्हणून श्रीनिधी यांना दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ भाजपने शेअर केल्यानंतर एकच खळबळ उडाली. मग भाजपाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओच हटवला.

    श्रीनिधी चिदंबरम या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात. त्या उत्तम कलाकारही आहेत. भाजपाच्या प्रचार व्हिडिओमध्ये तामिळनाडूची संस्कृती दाखवण्यात आली आहे. श्रीनिधी चिदंबरम यात भरतनाट्यम करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेलं गाणं  तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी लिहिलेलं आहे.

    तामिळनाडूच्या निवडणुकीत भाजपाची सत्तारुढ अण्णा द्रमुक पक्षाशी युती आहे. तर काँग्रेसनं प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकशी आघाडी केली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ भाजपने सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं. नाईलाजाने भाजपाने हा व्हिडिओच काढून टाकला.

    काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्या मते भाजपाने श्रीनिधी यांचा व्हिडीओ परवानगी न घेता वापरला आहे.