यमुना एक्सप्रेस-वे वेर डिव्हायडरला धडकून टँकरचा कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

मृत झालेल्या व्यक्ती हरियाणामधील जींद जिल्ह्यातील राहणाऱ्या आहेत. या अपघाताची माहिती मिळताच डीएम नवनीत चहल आणि एसएसपी गौरव ग्रोवर घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी एक्सप्रेस वेवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृत व्यक्तींच्या पार्थिवाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. अपघात झाल्यानंतर टँकरमधून बराचवेळ डीझेल रस्त्यावर पसरलं.

    उत्तर प्रदेशातील मथुरा एक्सप्रेस-वे वर काल (मंगळवार) रात्री १२.३० वाजताच्या सुमारास भरघाव टँकर पलटी होऊन कारचा भीषण झाला. या अपघातात कारमधील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भयंकर होता की, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेल्या व्यक्ती हरियाणामधील जींद जिल्ह्यातील राहणाऱ्या आहेत. या अपघाताची माहिती मिळताच डीएम नवनीत चहल आणि एसएसपी गौरव ग्रोवर घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी एक्सप्रेस वेवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृत व्यक्तींच्या पार्थिवाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. अपघात झाल्यानंतर टँकरमधून बराचवेळ डीझेल रस्त्यावर पसरलं.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात नौझझील परिसरातील माईल स्टोन येथील ६८ जवळ झाला. भरघाव टँकर नोएडाच्या दिशेने जात होता. परंतु वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यामुळे टँकर डिव्हायडरला धडकून पलटी झाला आणि तो थेट कारला जाऊन धडकला. त्यामुळे कारमधील एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.