Asuddin Owaisi

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशमधील घटनांबद्दल माहिती देत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील बलरामपूर येथे झालेल्या एका सभेदरम्यान हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राज्यातील एन्काउंटरमध्ये मुस्लिमांना निशाणा केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

    वाराणसी : एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशमधील घटनांबद्दल माहिती देत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील बलरामपूर येथे झालेल्या एका सभेदरम्यान हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राज्यातील एन्काउंटरमध्ये मुस्लिमांना निशाणा केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

    जेव्हापासून भाजपाचे सरकार आले आहे, तेव्हापासून या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2017-2020 या काळात उत्तर प्रदेशात तब्बल सहा हजार एन्काउंटर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यात मारले गेलेले 37 टक्के मुस्लिम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अखेर हा अत्याचार का? असा सवालही त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशात संविधानराज नाही. याठिकाणी संविधानाचे अजिबातही पालन होत नाही. पुढे ओवैसी म्हणाले, तो दिवसही लवकरच उजडेल जेव्हा उत्तर प्रदेशात योगी सरकार येणार नाही असा आरोपही त्यांनी केला.

    असदुद्दीन ओवैसींच्या या वक्तव्याला उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री मोहसिन रजा यांनी दिले आहे. ते म्हणाले, की असदुद्दीन ओवैसींनी लोकांना सल्ला द्यायला पाहिजे, की अपराध्यांमध्ये इतके जास्त प्रमाण का आहे? ओवैसींनी प्रत्येकाला समजवायला हवे की बॅरिस्टर बना, गुन्हेगार कोणीच बनू नका. ओवैसींचे पूर्वज हे देशात फूट पाडणारे होते. आज ओवैसी ज्या प्रकारचे वक्तव्य करत आहेत, हेदेखील याच गोष्टीचे संकेत आहेत.