तरुण तेजपाल निर्दोष; गोवा न्यायालयाचा निर्णय

पीडितेचा आरोप आहे की, 2013 साली गोव्याच्या एका हॉटेलमध्ये तेजपाल यांनी तिचे लैंगिक शोषण केले होते. न्यायालयाने ज्यावेळी आपला निकाल सुनावला तेव्हा तेपजाल तिथे उपस्थित होते. याप्रकरणाची सुनावणी न्यायालयाने पूर्ण केली होती आणि याचा निकाल 27 एप्रिल रोजी लावला जाणार होता, पण तारखा पडत राहिल्या. याप्रकरणी तेजपाल यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या टीमचे प्रमुख राजीव गोम्स यांचा गेल्या आठवड्यात कोरोनाने मृत्यू झाला.

    पणजी : तहलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल हे लैंगिक शोषणाच्या सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त झाले आहेत. गोव्याच्या एका न्यायालयाने याप्रकरणी सर्व आरोपांमधून तेजपाल यांची मुक्तता केली आहे. त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.

    पीडितेचा आरोप आहे की, 2013 साली गोव्याच्या एका हॉटेलमध्ये तेजपाल यांनी तिचे लैंगिक शोषण केले होते. न्यायालयाने ज्यावेळी आपला निकाल सुनावला तेव्हा तेपजाल तिथे उपस्थित होते. याप्रकरणाची सुनावणी न्यायालयाने पूर्ण केली होती आणि याचा निकाल 27 एप्रिल रोजी लावला जाणार होता, पण तारखा पडत राहिल्या. याप्रकरणी तेजपाल यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या टीमचे प्रमुख राजीव गोम्स यांचा गेल्या आठवड्यात कोरोनाने मृत्यू झाला.

    न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने आल्यानंतर तेजपाल यांनी न्यायालयाचे आभार मानले आणि म्हटले, नोव्हेंबर 2013मध्ये माझ्या एका सहकाऱ्याने माझ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. आज सत्र न्यायालयाने माझी मुक्तता केली. या वर्षांमध्ये अनेक वकिलांनी मला मदत केली, मी त्या सर्वांचा ऋणी आहे. आपल्या पित्याकडून जारी केलेले पत्र वाचून दाखवताना त्यांच्या मुलीने म्हटले, गेल्या साडेसात वर्षांमध्ये आमचे कुटुंब खूप वाईट काळातून गेले आहे.