अकरावीच्या विद्यार्थ्याला घेऊन चक्क शिक्षिका गेली पळून, शिकवणीसाठी रोज भेटायचे पण अचानक दोघेही गायब

एका खासगी शाळेची शिक्षिका १७ वर्षाच्या विद्यार्थ्यासह(Teacher Ran Away With student) पळून गेल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे.

    हरियाणाच्या(Haryana) पानिपत(Panipat) शहरात एक वेगळीच घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शिक्षक-विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला डाग लागला आहे. एका खासगी शाळेची शिक्षिका १७ वर्षाच्या विद्यार्थ्यासह(Teacher Ran Away With student) पळून गेल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. पोलिसांक़डे तशी तक्रार केली आहे. पानिपतच्या देशराज कॉलनीत एका खासगी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेवर विद्यार्थ्यासह पळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही शिक्षिका महिला घटस्फोटीत असून आपल्या माहेरी राहत होती.

    विद्यार्थ्याच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे २९ मे रोजी दुपारी दोन वाजता शिक्षिकेच्या घरी शिकवणीसाठी गेला होता. मात्र तो परत आला नाही. शिक्षिकेच्या कुटुंबाने प्रथम या विषयावर बोलणे टाळले. त्यानंतर त्यांनी मुलीच्या बेपत्ता होण्याविषयी माहिती दिली.

    याप्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिक्षिका आणि विद्यार्थ्याचा शोध घेत आहेत. ते गायब झाल्यापासून त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद आहेत. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले आहे की, त्यांचा मुलगा अकरावीत असून पळून गेलेली महिला त्याची वर्गशिक्षिका आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २ वर्षांपासून हा अल्पवयीन विद्यार्थी शिक्षिकेच्या घरी शिकवणीसाठी जात होता. लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी दररोज चार-चार तासांच्या शिकवणीसाठी शिक्षिकेच्या घरी जायचे.मात्र २९ मे रोजी दोघेही अचानक गायब झाले. दोघांचा अजून काहीच पत्ता लागलेला नाही.