Tejaswi Yadav's statement has caused a stir in Bihar Election winds to blow again in Bihar

तेजस्वी यादव(tejaswi yadav criticized bjp यांनी म्हटले आहे की, “भाजपा इतका मोठा पक्ष आहे. मात्र सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजपा बंगालमध्ये आली आहे. यांचा बोहल्यावर बसणारा नवरा कोण आहे? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या एकातरी नेत्याचं नाव सांगून दाखवा.

    पश्चिम बंगाल निवडणुकीची(west bengal election) रणधुमाळी सुरु आहे. अशातच विरोधी पक्षनेता तेजस्वी यादव(tejaswi yadav) यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. या टीकेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

    तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे की, “भाजपा इतका मोठा पक्ष आहे. मात्र सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजपा बंगालमध्ये आली आहे. यांचा बोहल्यावर बसणारा नवरा कोण आहे? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या एकातरी नेत्याचं नाव सांगून दाखवा. ज्यांना विधानसभेचा अनुभव नाही. तुम्ही त्यांच्याकडे सत्ता सोपवणार का?” असा प्रश्न तेजस्वी यादव यांनी विचारला आहे.

    बंगालमध्ये भाजपाकडे मुख्यमंत्रीपदाचा एकही उमेदवार नसल्याचं अधोरेखित करत तेजस्वी यादव यांनी भाजपवर टीका केली आहे.

    ते बिहारबाबत म्हणाले की, “आम्ही निवडणुकीत हरलो नाही तर आम्हाला हरवण्यात आलं, बिहारचं सध्याचं सरकार चोर दरवाज्यातून आलं आहे, बिहारची जनता ही बाब खूप चांगली समजते”. राष्ट्रीय जनता दलाचे नेता तेजस्वी यादव यांनी सोमवारी तृणमूलच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी त्यांची युती होण्याची शक्यता आहे.