tejasvi yadav

पुढील वर्षी पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (RJD leader Tejashwi Yadav) यांनी दिले आहेत. तेजस्वी यादव यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

बिहार : बिहारमध्ये (Bihar) आताच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन केले आहे. परंतु या सरकारवर बिहारमधील जनता नाराज असल्याचे दिसत आहे, त्यामुळे पुढील वर्षी पुन्हा निवडणुका ( Election )  होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (RJD leader Tejashwi Yadav) यांनी दिले आहेत. तेजस्वी यादव यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

बिहारमध्ये निवडणुका होऊन एक महिना देखील झाला नाही, अशातच यादव यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळातील सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभा निवडणूक निकालाची नुकतीच आढावा बैठक घेतली होती. यावेळी बैठकीमध्ये ते म्हणाले की, माझे राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी मला पूर्ण अधिकार दिले आहेत. सक्रिय रहा, पुढील वर्षी पुन्हा निवडणूक होऊ शकतात. या निवडणुकीत सर्वांनी पूर्ण तयारीनिशी उतरावे, असेही ते म्हणाले असल्यारे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

तसेच यावेळी त्यांनी पक्षात मोठे फेरबदल करण्याचेही संकेत दिले आहेत. पक्ष सर्वच समूहातील लोकांना संधी देईल. आपले अनेक उमेदवार पक्षातूनच झालेल्या बंडखोरीमुळे पराभूत झाले आहेत, असे करूनही कुणालाही फायदा होत नाही. ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांना पक्ष दुसरीकडे संधी देईल, पण पक्षात राहूल पक्षविरोधी काम करणे चांगले नसल्याचे यादव म्हणाले.