जम्मू काश्मीर गारेगार, पसरली बर्फाची चादर

हिमाच्छादित शिखरांच्या मधोमध वसलेल्या जम्मू आणि काश्मीरला आता कडाक्याच्या थंडीनं आपल्या कवेत घेतलंय. जम्मू काश्मीरमधील किमान तापमान आता १ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. तर कमाल तापमान नोंदवलं गेलंय १० अंश सेल्सिअस.

भारताचा स्वर्ग म्हटलं जाणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये सध्या तापमानाचा पारा घसरायला सुरुवात झालीय. थंडगार वाऱ्यांमुळे सध्या काश्मीरकरांना चांगलीच हुडहुडी भरू लागलीय.

हिमाच्छादित शिखरांच्या मधोमध वसलेल्या जम्मू आणि काश्मीरला आता कडाक्याच्या थंडीनं आपल्या कवेत घेतलंय. जम्मू काश्मीरमधील किमान तापमान आता १ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. तर कमाल तापमान नोंदवलं गेलंय १० अंश सेल्सिअस.

मध्यरात्री पारा चांगलाच घसरत असून बहुतांश ठिकाणी बर्फाची चादर पसरली आहे. मात्र महाराष्ट्राप्रमाणेच जम्मू काश्मीरमध्येही सध्या ढगांनी दाटी करायला सुरुवात केलीय.  काश्मीरमध्ये हलका पाऊस पडू शकतो, असां अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.

काश्मीरमधील थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकदेखील येत असून त्यांचं प्रमाण मात्र उन्हाळ्याच्या तुलनेत कमी आहे. साधारण उन्हाळ्याच्या मौसमात काश्मीरमधील वातावरण आल्हाददायक असतं. मात्र काही पर्यटकांना कडाक्याच्या थंडीत काश्मीरमधील निसर्गाचा आणि बर्फाचा आनंद घेणं आवडत असल्यामुळे ते थंडीच्या काळातही काश्मीरमध्ये हजेरी लावत असतात.