
बडवानी : मध्य प्रदेशात कोंबड्यांची लुट झाली आहे. कोंबड्यांचा टेम्पो उलटून अपघात झाला. यानंतर रस्त्यावर नागरीकांची झुंबड उडाली. काही मिनीटांत ३०० कोंबड्यांची लूट झाली.
मध्य प्रदेशातील बडवानी भागात कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिक अप टेम्पोला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो रस्त्यावर उलटला. मग, काय नागरीकांनी अपघातग्रत टेम्पोला मदत करण्यासाठी नाही तर कोंबड्या लुटण्यासाठी नागरीकांनी धावाधाव केली.
कोंबड्या लुटण्यासाठी झालेली गर्दी वाहनचालकाला काही झेपली नाही. काही जण थेट बाईक काढून घटना स्थळी आले आणि कोंबड्या लुटून गेले. हाताला लागतील तितक्या कोंबड्या धरुन नागरिक पसार झाले.
या टेम्पोत असलेल्या हजार कोंबड्यांपैकी ६०० ते ७०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या, तर ३०० ते ४०० कोंबड्या नागरीकांनी लूटन नेल्या. यामुळे वाहनचालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.