जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये दहशतवादी हल्ला ; दोन जवान शहीद

अरमपोरा नाक्यावरील तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात स्थानिक दोन नागरिकांना देखील जीव गमावावा लागला आहे. याचबरोबर पोलिसांच्या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

    जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये अरमपोरा नाका येथे आज दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन जवान शहीद झाले असून, दोन नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. त्याचसोबतच अन्य दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला लष्कर ए तोयबाने घडवला असल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली आहे.

    अरमपोरा नाक्यावरील तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात स्थानिक दोन नागरिकांना देखील जीव गमावावा लागला आहे. याचबरोबर पोलिसांच्या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

    हल्ला केल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून फरार झाले असून जवानांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.