Terrorist attack in Jammu and Kashmir soldier naresh umrao badole martyr of Maharashtra
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, महाराष्ट्रातील सुपुत्र हुतात्मा

महाराष्ट्रातील (maharashtra) एका सुपुत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण (Martyr) आलं आहे. नरेश उमराव बडोले (Naresh Umrao Badole) असं या जवानाचं नाव आहे.

श्रीनगर (Srinagar) : जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील बडगाव जिल्ह्यात (Badgaon District) आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorists attack) सीआरपीएफचा (crpf) एका जवान गंभीर जखमी झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता उपचारादरम्यान त्याचं निधन (passes away) झाल्याची माहिती समोर आली आहे. नरेश उमराव बडोले (Naresh Umrao Badole) असं या जवानाचं नाव आहे. आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शत्रूशी लढताना नरेश बडोले यांना हौतात्म्य आलं.

दहशतवादी त्यांची सर्विस रायफल देखील आपल्यासोबत घेऊन गेले होते. पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यातील कॅसरमुल्लामध्ये सीआरपीएफच्या ११७ व्या बटालीयनमधील एका जवानावर गोळी झाडली. त्यांनी पुढे सांगितले की, दहशतवादी त्यांची सर्विस रायफल (ए.के.रायफल) सोबत घेऊन गेले. जवानाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा भाग सील करण्यात आला असून दहशतवाद्यांचा तपास सुरू आहे.

नरेश बडोले हे नागपूर येथे राहणारे असून त्यांचे लग्न झाले आहे. त्यांना हौतात्म्य आल्यानंतर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. महाराष्ट्रातील एका सुपूत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं आहे.