pressure cooker bomb

उत्तर प्रदेशच्या दहशवाद विरोधी पथकाला (UP ATS) दोन संशयित दहशतवाद्यांकडून काशी आणि मथुरेसह (Kashi and Mathura) काही शहरांचे नकाशे मिळाले आहेत.त्या दोघांनी  ३००० रुपयांमध्ये एक कुकर बॉम्ब (Cooker Bomb) तयार करण्याचं काम केलं होतं, अशी माहितीदेखील उघड झाली आहे.

    लखनऊ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनऊमधून (Lucknow) पकडण्यात आलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांनी अखेर तोंड उघडलंय आणि त्यांच्या जबानीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    उत्तर प्रदेशच्या दहशवाद विरोधी पथकाला (UP ATS) दोन संशयित दहशतवाद्यांकडून काशी आणि मथुरेसह (Kashi and Mathura) काही शहरांचे नकाशे मिळाले आहेत.त्या दोघांनी  ३००० रुपयांमध्ये एक कुकर बॉम्ब (Cooker Bomb) तयार करण्याचं काम केलं होतं, अशी माहितीदेखील उघड झाली आहे.

    इंटरनेटवर काही वेबसाईट बघून आपण बॉम्ब बनवायला शिकलो, असं अल्-कायदासाठी काम करणाऱ्या या दोन दहशतवाद्यांनी सांगितलं आहे. एकूण ३००० रुपयांत आपण कुकर-बॉम्ब तयार केल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.

    उत्तर प्रदेशच्या एटीएसनं एक मॉड्युलदेखील जप्त केलं आहे. विविध प्रकारची स्फोटकं वापरून स्वतः बॉम्ब कसा तयार करावा, हे शिकवणारं मॉड्युल वापरूनच दहशतवादी कारवाया सुरू असल्याचं आतापर्यंतच्या तपासातून समोर येत आहे. ई रिक्षाच्या बॅटरीचा वापर करून हा बॉम्ब तयार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

    या दोघांकडे सापडलेल्या काशी आणि मथुरेच्या  नकाशावर शहरातील काही भागांभोवती खुणा करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. एटीएसनं गोरखपूरचा एक नकाशाही या दहशतवाद्यांकडून जप्त केला आहे. मोठ्या शहरांमधील धार्मिक स्थळांवर हल्ले करण्याची योजना दहतवादी संघटनांची असल्याचं आतापर्यंतच्या पुराव्यांमधून प्रथमदर्शनी समोर येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोन दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर दहा -बारा जणांना अटक केली असून त्यांच्या चौकशीतून या प्रकरणाचे अधिक धागेदोरे शोधून काढण्याचं काम पोलीस करत आहेत.