ते मुल माझ नाही; नवऱ्याने नकार दिल्यानंतर अभिनेत्री नुसरत जहांनी घेतला मोठा निर्णय

अभिनय क्षेत्रातून राजकारणात एन्ट्री घेतलेली बंगाली अभिनेत्री तसेच आता तृणमूल काँग्रेसची खासदार असलेल्या नुसरत जहां यांनी निखिल जैनसोबत कोणतेही वैवाहिक संबंध नसून त्याच्यापासून विभक्त होत असल्याचे सांगितले आहे. 2019 मध्ये दोघांनी केलेले लग्न अवैध असल्याचा मोठा खुलासा त्यांनी केला आहे.

    कोलकाता : अभिनय क्षेत्रातून राजकारणात एन्ट्री घेतलेली बंगाली अभिनेत्री तसेच आता तृणमूल काँग्रेसची खासदार असलेल्या नुसरत जहां यांनी निखिल जैनसोबत कोणतेही वैवाहिक संबंध नसून त्याच्यापासून विभक्त होत असल्याचे सांगितले आहे. 2019 मध्ये दोघांनी केलेले लग्न अवैध असल्याचा मोठा खुलासा त्यांनी केला आहे.

    पैशाचा दुरुपयोग, दागिने आणि अन्य संपत्ती अवैधरित्या निखिलने घेतली असल्याचा आरोप तिने केला आहे. निखिल आणि नुसरत गेल्या सहा महिन्यांपासून सोबत राहत नसल्याची माहिती आहे. तसेच नुसरत गर्भवती असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

    मात्र, नुसरत गर्भवती असेल, ते मुल आपले नसल्याचे निखिलने म्हटले आहे. अभिनेता यश दासगुप्ता आणि नुसरत एकमेंकाना डेट करत असल्याची माहिती आहे.

    हे सुद्धा वाचा