नाद करा पण आमचा कुठं! एम्बॅसेडर कारला बनवलं मोठं ब्रँड अन् आनंद महिंद्रा भारावून म्हणाले…व्हिडिओ तुफान व्हायरल

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Businessman Anand Mahindra) यांनी एका आगळ्या वेगळ्या बैलगाडीचा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter)  शेअर केला आहे. अशी बैलगाडी तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल.

सर्जा राजा अशा बैलगाडीची जोडी तुम्ही पाहिलीच असेल. परंतु एका माणसाने या बैलगाडीची नवीन गाडी तयार करून त्याला ब्रँड बनवलं आहे. म्हणतात ना या दुनियेत अशक्य असं काहीही नाही..प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Businessman Anand Mahindra) यांनी एका आगळ्या वेगळ्या बैलगाडीचा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter)  शेअर केला आहे. अशी बैलगाडी तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. बैलगाडी आणि एम्बॅसेडर कारचा ( Bullock cart and ambassador car) असा जुगाड पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या हटके गाडीला पुढे बैल जोडले असून मागे बसण्याच्या जागेवर एम्बॅसेडर कार लावली आहे. पहिल्यांदा तुम्हाला वाटेल ही एम्बॅसेडर कार आहे. परंतु नंतर नीट नीरखून पाहिल्यास हा जुगाड तुम्हाला कळून येईल.

या व्हिडिओला आनंद महिंद्रांनी कॅप्शन दिलं आहे की, मला नाही वाटतं. एलन मस्क आणि टेस्ला या रीनूअबल एनर्जी-फ्यूल कारचा सामना करू शकतील. उत्सर्जनचा स्तर निश्चित नाही. जर तुम्ही मिथोनॉलचा विचार करत असाल.दरम्यान, हा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर २३ डिसेंबला शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांपेक्षा जास्त व्हूज मिळाले आहेत.