marriage

कर्नाटकात कोरोना संक्रमणाच्या केसेस वाढत असून लॉकडाऊनमध्ये लोक नियमांचे उल्लंघन करून लग्नाचे आयोजन करत आहेत. कर्नाटकातून लग्नासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. सध्या दोन लग्नावर छापे पाडण्यात आले. चिकमगलूर जिल्ह्यात जेव्हा अधिकाऱ्यांनी लग्नाच्या हॉलमध्ये धाड टाकली तेव्हा नवरदेव नवरीला सोडून पळाल्याची घटना घडली.

    बंगळुरू: कर्नाटकात कोरोना संक्रमणाच्या केसेस वाढत असून लॉकडाऊनमध्ये लोक नियमांचे उल्लंघन करून लग्नाचे आयोजन करत आहेत. कर्नाटकातून लग्नासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. सध्या दोन लग्नावर छापे पाडण्यात आले. चिकमगलूर जिल्ह्यात जेव्हा अधिकाऱ्यांनी लग्नाच्या हॉलमध्ये धाड टाकली तेव्हा नवरदेव नवरीला सोडून पळाल्याची घटना घडली.

    मंगळवारी काडुर तालुक्यात आयोजित या लग्नात 300 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. दोन्ही परिवारावर आणि इतर 10 लोकांवर गुन्हा दाखल करण्यत आला आहे. तेच मांड्या जिल्ह्यातील बी होसुर गावात आणखी एका ठिकाणी धाड टाकण्यात आली.

    इथे ग्राम पंचायत सदस्याच्या मुलीचे लग्न सुरू होते. यावेळी 300 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. नियमानुसार, लग्नाच्या आयोजनासाठी तहसीदाराकडून परवानगी घ्यावी लागते. पण या ग्रामपंचायत सदस्याने परवानगी घेतली नाही. त्यानंतर लग्नातून चार कार ताब्यात घेण्यात आल्या आहेत. 10 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.