नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला

जम्मू आणि काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागले असून यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी भाजपा सरकार आता राज्यात लवकर विधानसभा निवडणुका घेणार नाही. येथे झालेल्या पराभवानंतर मला नाही वाटत की भाजपा येथे लवकर विधानसभा निवडणुका घेईल. जर त्यांचा लोकशाहीवर विश्वास असेल तर आतापर्यंत निवडणुकांची घोषणा केली असती. आता आमच्याकडे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणखी वेळ असेल असे ओमर अब्दुल्ला म्हणाले. राज्यात भाजपाने 280 पैकी 74 तर गुपकार युतीला 112 जागा प्राप्त झाल्या आहेत. या विजयामुळे गुपकारमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

श्रीनगर (Shrinagar). जम्मू आणि काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागले असून यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी भाजपा सरकार आता राज्यात लवकर विधानसभा निवडणुका घेणार नाही. येथे झालेल्या पराभवानंतर मला नाही वाटत की भाजपा येथे लवकर विधानसभा निवडणुका घेईल. जर त्यांचा लोकशाहीवर विश्वास असेल तर आतापर्यंत निवडणुकांची घोषणा केली असती. आता आमच्याकडे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणखी वेळ असेल असे ओमर अब्दुल्ला म्हणाले. राज्यात भाजपाने 280 पैकी 74 तर गुपकार युतीला 112 जागा प्राप्त झाल्या आहेत. या विजयामुळे गुपकारमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गुपकार युती करण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, आम्हाला हेसुद्धा स्वीकारले पाहिजे की काही भागात आमच्या संघटनेत काही कमतरता आहेत. आम्ही काही जागांवर निवडणुका जिंकण्याची अपेक्षा करत होतो मात्र ते होऊ शकले नाही. नॅशनल कॉन्फरन्सविरोधात कितीही कारवाई केली तरी पक्षाचे अस्तित्व कायम राहणार असल्याचे ओमर अब्दुल्ला म्हणाले. पक्षाला नष्ट करण्याची ताकद केवळ अल्लमध्येच आहे असेही ते म्हणाले. खोटा प्रचार केल्याने काहीच साध्य होत नाही सत्य एक दिवस समोर येतेच असेही ते म्हणाले.

काँग्रेस देणार गुपकारला पाठिंबा
काँग्रेसने डीडीसी निवडणूक स्वबळावर लढविली असली तरी ज्या जिल्ह्यात गुपकारला बहुमत मिळविण्यात अपयश आले आहे तेथे काँग्रेस गुपकारला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्राने दिली. किश्तवाड, राजौरी आणि रामबान जिल्ह्यात काँग्रेस गुपकारला पाठिंबा देणार आहे असे समजते. काँग्रेसच्या या निर्णयावर भाजपाने सडकून टीका केली आहे.

तोपर्यंत निवडणूक लढणार नाही : मेहबुबा
डीडीसी निवडणुकीत लागलेले निकाल हे प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिली. यावेळी त्यांनी जोपर्यंत काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम पुन्हा लागू करण्यात येत नाही नाही तोपर्यंत आपण निवडणूक लढविणार नाही असेही मेहबुबा मुफ्ती यांनी जाहीर केले. आम्ही एकमेकांचे शत्रू आहोत, पण जम्मू काश्मीरच्या भल्यासाठी एकत्र येऊ शकतो. अखेर दिवसाच्या शेवटी आम्ही काश्मिरी आहोत. आम्ही फक्त निवडणुकांबद्दल बोलत नसून जम्मू काश्मीरच्या हिताची चर्चा करत आहोत. जे हरवले ते पुन्हा आणण्यासंबंधी बोलत आहोत, असेही मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.