The bride was forced to drink a bottle of acid, and her father-in-law's congregation locked the house and fled.

    जलौन : विवाहितेला बाटलीभर अ‍ॅसिड पाजून आरोपीनी घराला कुलूप लावून पळून गेले. उत्तर प्रदेशातील जलौन जिल्ह्यातील निमगाव हद्दीत हा भयंकर प्रकार घडला आहे. या प्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

    २७ वर्षीय पीडित महिलेच्या सासरची मंडळी हुंड्यासाठी तीचा प्रंचड छळ करत होती. हुंड्याच्या मागणीवरूनच सासरच्यांनी तिला अ‍ॅसिड पिण्यास जबरदस्ती भाग पाडले. पती अनूप कुमारसह शकुंतला देवी, मीरा देवी, ललितकुमार, गंगा देवी आणि पूजा देवीने तिला जबरदस्तीने अ‍ॅसिड प्यायला भाग पाडले. यात ती गंभीर जखमी झाली.

    या प्रकारबद्दल कळल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी सासरी धाव घेतली असता घराला कुलूप दिसले. मात्र, ही महिला आत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरवाजा खोलून त्यांनी तिला बाहेर काढले आणि तात्काळ उपचारासाठी रुगण्यालयात नेले. २०१८ मध्ये या महिलेचा विवाह झाला होता. हुड्यासाठी माझ्या बहिणीचा छळ केला जात असल्याचे पीडित महिलेच्या भावाने पोलिस तक्रारीत म्हंटले आहे.