बसला लागली आग, लहान बाळासह ५ जणांचा मृत्यू

कर्नाटका : कर्नाटकात चालत्या खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. कर्नाटकामधील चित्रदुर्गा येथे खासगी बसमध्ये प्रवासी वाहतुक करताना बसच्या इंजिनला आग लागली. पाहताच क्षणी आगीचा भडका उडाला. या आगीत एका लहानमुलासह अन्य ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर २७ जण जखमी झाले आहेत. आग इतकी भीषण होती की, बस जागेवरच जळून खाक झाली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या ५ जणांपैकी २ मुले आहेत आणि १ महिला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बसच्या इंजिनला आग लागल्याचे समजले जात आहे.