स्मशानभूमी प्रशासनाने केली पैशांची मागणी, नातेवाईकांनी रस्त्यावरच केले अंत्यसंस्कार

सूरतमधील एना गावात राहणारे मोहन राठोड यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची होती. मजूरी करुन कुटुंबाचे पालनपोषन करत होते. परंतु लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली होती.

गुजरात : गुजरातमधील सुरत शहरात धक्कादायक घटना घडली आहे. स्मशानभुमीत अंत्यसंसस्कारासाठी (funeral ceremony) गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांजवळ 2500 रुपये मागितल्याने नातेवाईकांनी रस्त्यावरच अंत्यसंस्कार विधी केला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी लाकडे गोळा केली आणि रस्त्यावरच मृतदेहास अग्नी दिली आहे.

सूरतमधील एना गावात राहणारे मोहन राठोड यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची होती. मजूरी करुन कुटुंबाचे पालनपोषन करत होते. परंतु लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली होती. राठोड यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांनी जवळच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेला होता. मात्र स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी अडीच हजार रुपयांची मागणी केल्याने नातेवाईकांनी रस्त्यावरच मृतदेहास अग्नी दिली.

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी १२०० रुपये आकारले जायचे परंतु आता मात्र २५०० रुपये मागितले जात आहेत. नातेवाईकांजवळ पैसे नसल्याने त्यांनी रस्त्यावरच अंत्यसंस्कार केले.