तीस वर्षांपूर्वीचे शेतकरी आणि सध्याचे शेतकरी यांच्यात खूप फरक, काँग्रेस नेत्याने भाजपचा घेतला खरपूस समाचार

साध्या भोळ्या शेतकऱ्यांना कोणत्याही गोष्टीची नीट माहिती न देता त्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला. त्या आरोपावर काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपचा  खरपूस समाचार घेतला आहे.

शेतकरी कायद्यांविरोधात (Agriculture Laws)  दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन (Agitation) सुरू आहे. केंद्र सरकारचे मंत्री (Central Government) आणि शेतकरी (Farmers) यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज ८ डिसेंबरला शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सिंघु सीमेवर (Singhu Border) होत आहे. तसेच त्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली असून देशभरात बंद पाळला जात आहे.

साध्या भोळ्या शेतकऱ्यांना कोणत्याही गोष्टीची नीट माहिती न देता त्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला. त्या आरोपावर काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी भाजपचा  खरपूस समाचार घेतला आहे.

इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन करण्यासाठी येथे उपस्थित असलेले शेतकरी वेडे आहेत का? आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की तीस वर्षांपूर्वीचे शेतकरी आणि सध्याचे शेतकरी यांच्यात खूप फरक आहे. हल्लीचा शेतकरी हा सुशिक्षित आहे. त्याला आसापस घडणाऱ्या गोष्टींची अगदी नीट माहिती असते, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर लावलेले आरोप फेटाळून लावले.