कोर्टाने जामीन नाकारला; मग कैद्यांनी जे केले त्याने पोलिसांनाही घाम फुटला

जामीन मिळाला नाही म्हणून कैद्यांनी चक्क कोर्टातून पोलिसांना चकवा देऊन धूम ठोकली. बिहारच्या दानापूरमध्ये ही घटना घडली. दानापूर न्यायालयात सुनावणीवेळी कैद्यांना आणले असता कोर्टाने त्यांना जामीन नाकारला. त्यानंतर सात कैद्यांनी पोलिसांना गुंगारा देऊन न्यायालयातून धूम ठोकली. यामुळे पाटणा पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

    पाटणा : जामीन मिळाला नाही म्हणून कैद्यांनी चक्क कोर्टातून पोलिसांना चकवा देऊन धूम ठोकली. बिहारच्या दानापूरमध्ये ही घटना घडली. दानापूर न्यायालयात सुनावणीवेळी कैद्यांना आणले असता कोर्टाने त्यांना जामीन नाकारला. त्यानंतर सात कैद्यांनी पोलिसांना गुंगारा देऊन न्यायालयातून धूम ठोकली. यामुळे पाटणा पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

    वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची दखत घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांचे एक पथक फरार आरोपींना शोधण्यासाठी रवाना झाले आहे. सिगोडी पोलिस स्टेशन परिसरातील नरौली गावात विजेच्या वादातून दोन गटांमध्ये मारहाण झाली पुढे प्रकरण एवढे वाढले की मारहाणीचे रूपांतर गोळीबार होण्यापर्यंत गेले. याप्रकरणी जवळपास 12 ते 15 लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.

    या संदर्भात पोलिसांनी कलम 72/21 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी यातील 8 आरोपींनी सरेंडर केले होते. यानंतर कोर्टाने जामीन अर्ज फेटाळताना त्या सर्व आरोपींना एकसोबतच कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. सर्व सरेंडर केलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यासाठी पोलिस कैद्यांच्या वाहनाकडे जात होते, त्यावेळी पोलिसांना चकवा देऊन सर्व 7 कैदी तिथून पळून गेले.

    हे सुद्धा वाचा