The craving became expensive; 50,000 for a cup of coffee

हायवेवरून प्रवास करताना अनेकांना हॉटेलांत थांबून चहा-कॉफी घेण्याची सवय असते. मात्र, ही सवय तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. अहमदाबादेतल्या एका बँक मॅनेजरनी एसजी हायवेवर अशीच एक कप कॉफी घेतली पण ती त्याला तब्बल ५० हजार रुपयांना पडली.

अहमदाबाद : हायवेवरून प्रवास करताना अनेकांना हॉटेलांत थांबून चहा-कॉफी घेण्याची सवय असते. मात्र, ही सवय तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. अहमदाबादेतल्या एका बँक मॅनेजरनी एसजी हायवेवर अशीच एक कप कॉफी घेतली पण ती त्याला तब्बल ५० हजार रुपयांना पडली.

एका बँकेचा मॅनेजर अहमदाबादजवळच्या एसजी हायवेवरून चालला होता. त्याला लहर आली म्हणून तो कॉफी प्यायला एका हॉटेलात थांबला. बरेचदा आपणही हायवेवर असे थांबतो. पण त्यावेळी आपण जिथे जागा मिळेल तिथं गाडी पार्क करतो. तसेच या बँक मॅनेजरनी केलं. गाडी पार्क करून तो कॉफी प्यायला गेला.

कॉफी पिऊन आल्यावर पाहतो तर काय? त्याच्या कारच्या काचा फोडून त्यातून काही कागदपत्रं आणि ५० हजार रुपयांचा लॅपटॉप चोरीला गेला होता. त्यामुळे साधी कॉफी त्याला ५० हजार रुपयांना पडली.

महाराष्ट्रातल्या एका खासगी बँकेत सीनिअर मॅनेजर पदावर काम करणारे निशांत पटेल आपली बायको आणि सासूबाईंसोबत ८ जानेवारीला अहमदाबादमध्ये आले होते. घर बरेच दिवस बंद होते म्हणून ते कोर्टयार्ड मॅरिएट हॉटेलातच थांबले.

नंतर बायकोसोबत निशांत हायवेवरील गोयल प्लाझाजवळ असलेल्या शंभू कॉफी बारमध्ये कॉफी प्यायला थांबले. परत आल्यावर त्यांच्या कारच्या काचा फोडल्या होत्या आणि आतला ५० हजार रुपयांचा लॅपटॉप चोरीला गेला होता. त्याचबरोबर काही कागदपत्रंही चोरीला गेली होती. त्यानंतर निशांत यांनी वस्रापूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस पुढचा तपास करत आहेत.