शिक्षा म्हणून आठ महिन्याच्या गर्भवतीला रणरणत्या उन्हात तीन किलोमीटर चालवले ; पोलीस अधिकारी निलंबित

मी त्या महिला पोलीस निरिक्षकाकडे मलाही माझ्या पतीसोबत घेऊन जा अशी विनंती केली. मात्र त्यांनी नकार दिला,” असं गुरुबारी यांनी म्हटलं आहे. त्यानंतर गुरुबाली तीन किलोमीटरवर असणाऱ्या पोलीस स्थानकावर भर उन्हामध्ये चालत गेल्या. त्यानंतरही या दोघांना पोलिसांनी तिथे दोन तास वाट पहायला लावली.

    ओडिशामधील मयुरभांज जिल्ह्यात एका गरोदर महिलेला रणरणत्या उन्हात तीन किलोमीटरपर्यंत चालण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाजीरवाणीबाब म्हणजे दुचाकीवरून जात असताना संबंधित महिलेच्या पतीनं हेल्मेट घातलं होत पण मागे बसलेल्या पत्नीने हेल्मेट घालत नव्हतं त्यामुळे चालण्याची देण्यात आली होती. याप्रकरणी महिला पोलीस निरिक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे.

    बिक्रम बिरुली हे आपल्या आठ महिन्याच्या गरोदर पत्नीला तपासणीसाठी घेऊन जात असतानाच सारत पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये पोलिसांनी या जोडप्याला अडवलं. बिक्रम हे गाडी चालवत असल्याने त्यांनी हेल्मेट घातलं होतं. मात्र त्यांच्य मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी गुरुबारी बिरुली यांनी हेल्मेट घातलं नव्हतं. पोलिसांनी या प्रकरणामध्ये बिरुली दांपत्याला दंड ठोठावला. मात्र बिक्रम यांच्याकडे दंड देण्याइतके पैसे नव्हते. मी ऑनलाइन माध्यमातून दंड भरतो असं बिक्रम यांनी सांगितलं. मात्र त्यानंतरही पोलिसांनी त्यांना सोडण्यास नकार दिला. त्यानंतर सातर पोलीस स्थानकातील पोलीस निरिक्षक रिना बक्सला आणि बिक्रम यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर बिक्रम यांना पोलिसांच्या गाडीतून पोलीस स्थानकात घेऊन जाण्यात आलं. मात्र बिक्रम यांना घेऊन जाताना रिना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आठ महिन्याच्या गरोदर असणारा गुरुबारी यांना नेलं नाही आणि कोणीही सोबत नसताना निर्जनस्थळी त्यांना एकटं सोडून पोलीस बिक्रम यांना घेऊन निघून गेले.

    “मी त्या महिला पोलीस निरिक्षकाकडे मलाही माझ्या पतीसोबत घेऊन जा अशी विनंती केली. मात्र त्यांनी नकार दिला,” असं गुरुबारी यांनी म्हटलं आहे. त्यानंतर गुरुबाली तीन किलोमीटरवर असणाऱ्या पोलीस स्थानकावर भर उन्हामध्ये चालत गेल्या. त्यानंतरही या दोघांना पोलिसांनी तिथे दोन तास वाट पहायला लावली. या प्रकरणामध्ये मयुरभांजचे पोलीस अधीक्षक स्मित परमार यांनी रिना बक्सला यांना निलंबित केलं आहे.

    ही महिला गरोदर असल्याचं दिसून येत होतं. या जोडप्याने घडलेल्या प्रकरणासंदर्भात उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे रितरस तक्रार केली आहे. एक महिला असूनही रिना यांनी अशाप्रकारे वागणं असंवेदनशीलपणाचं लक्षण आहे, असं परामर यांनी द हिंदूशी बोलताना सांगितलं. मागील वर्षीच ओडिशा सरकारने दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट घालणं बंधनकारक आहे असा आदेश जारी केला होता.