सिलिंडरचा स्फोट होऊन दोन घरे जमीनदोस्त; ढिगाऱ्याखाली 8 जण ठार

त्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात गॅस सिलिंडरच्या झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा स्फोट इतका भयंकर होता की यामध्ये दोन घरे जमीनदोस्त झाली.

  लखनौ : उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात गॅस सिलिंडरच्या झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा स्फोट इतका भयंकर होता की यामध्ये दोन घरे जमीनदोस्त झाली.

  या मलब्याखाली 14 लोक अडकले होते. पोलिसांच्या मदतीने गावकऱ्यांनी या लोकांना बाहेर काढले परंतु, तोपर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला होता. मृतकांमध्ये 2 पुरुष, 2 महिलांसह 4 लहान मुलांचाही समावेश आहे.

  जखमींना जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर लखनौच्या ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. फॉरेन्सिक टीम स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.

  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा