khattar government

कोरोनामुळे अनेक राज्यांमधील परिस्थिती भीषण होत चालली आहे. सर्वोच्च न्यायालयापासून ते जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांपर्यंत अनेकांनी भारतातील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशातील आरोग्य व्यवस्था सध्या व्हेंटिलेटरवर आहे. हरियाणादेखील याला अपवाद नाही. मात्र, या परिस्थितीवर बोलताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी धक्कादायक विधान केले आहे.

    चंदीगड : कोरोनामुळे अनेक राज्यांमधील परिस्थिती भीषण होत चालली आहे. सर्वोच्च न्यायालयापासून ते जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांपर्यंत अनेकांनी भारतातील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशातील आरोग्य व्यवस्था सध्या व्हेंटिलेटरवर आहे. हरियाणादेखील याला अपवाद नाही. मात्र, या परिस्थितीवर बोलताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी धक्कादायक विधान केले आहे.

    हरियाणातील कोरोना स्थिती, मृतांचा आकडा, त्यातील लपवाछपवी याबद्दल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ही वेळ आकड्यांवर लक्ष देण्याची नाही. आमच्या आकांडतांडवाने मेलेली माणसे जिवंत होणार नाहीत, असे वक्तव्य खट्टर यांनी केले. रुग्णांपर्यंत आरोग्य सुविधा कशा पोहोचतील याकडे आपण लक्ष द्यायला हवे. आम्ही त्याच उद्देशाने सध्या प्रयत्न करत आहोत, असे खट्टर म्हणाले.

    राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा नाही. रुग्णांना हरतऱ्हेच्या सुविधा देण्यास राज्य सरकारचे प्राधान्य दिले जात असल्याचे खट्टर यांनी सांगितले. राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी खट्टर यांनी रोहतक, पानीपत, फरिदाबादचा दौरा केला. रेवाडी, गुरुग्राम आणि हिसारमध्ये गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. त्यावर राज्यात कुठेही वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा नाही. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती खट्टर यांनी दिली.