डॉक्टरांनी जिवंत बाळाला केलं मृत घोषित, अन् अंत्यसंस्कारावेळी घडलं असं की…

एका खासगी क्लिनिकने प्रसूतीनंतर जिवंत नवजात बाळाला मृत घोषित केल्याचं समोर आलं आहे. झारखंडच्या देवघरमधील काली मंडा रोडवरील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली आहे. नवजात बाळाला चांगल्या उपचारासाठी देवघर इथे घेऊन जाण्यात आलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र संबंधित रुग्णालयाच्या संचालकांनी हे सर्व खोटं असल्याचा दावा केला आहे.

    रांची : झारखंडमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका खासगी क्लिनिकने प्रसूतीनंतर जिवंत नवजात बाळाला मृत घोषित केल्याचं समोर आलं आहे. झारखंडच्या देवघरमधील काली मंडा रोडवरील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली आहे. नवजात बाळाला चांगल्या उपचारासाठी देवघर इथे घेऊन जाण्यात आलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र संबंधित रुग्णालयाच्या संचालकांनी हे सर्व खोटं असल्याचा दावा केला आहे.

    नेमकं काय घडलं?

    डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीय त्याला घेऊन घरी गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र, अंत्यसंस्कारावेळीच नवजात बाळ अचानक रडू लागलं. यानंतर सर्वांनाच धक्का बसला. यानंतर वैतागलेल्या नातेवाईकांनी क्लिनिकची तोडफोड करत आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

    क्लिनिकमध्ये तिच्या सुनेची प्रसूती केली गेली. जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हे बाळ जिवंत नसून त्याचा मृत्यू झाला आहे, असं नवजात बाळाची आजी रेखा देवी यांनी सांगितलं.