शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटात डॉक्टर विसरले टॉवेल

२९ जुलैला प्रसुतीसाठी महिलेचे ऑपरेशन करण्यात आले होते. ऑपरेशन केल्या नंतरही वेदना कमी होत नव्हत्या. तिला सतत वेदना होत होत्या तसेच जखमेतून पाणी व पस निघत होते. त्यामुळे कुटुंबियांनी तिला पाटण्याला हलवले परंतु तरिही वेदना कमी होत नव्हत्या.

बिहार : बिहारमधील गयामध्ये महिला रुग्णाबाबत धक्कादायक घटना घडली आहे. ऑपरेशन केल्यानंतर पोटात टॉवेल राहिल्याची घटना घडली आहे. ऑपरेशन दरम्यान २१ वर्षीय महिलेच्या पोटात डॉक्टरने टॉवेल तसाच ठेवला होता. (doctor forgot the towel on the woman’s abdomen) या महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

२९ जुलैला प्रसुतीसाठी महिलेचे ऑपरेशन करण्यात आले होते. ऑपरेशन केल्या नंतरही वेदना कमी होत नव्हत्या. तिला सतत वेदना होत होत्या तसेच जखमेतून पाणी व पस निघत होते. त्यामुळे कुटुंबियांनी तिला पाटण्याला हलवले परंतु तरिही वेदना कमी होत नव्हत्या.

महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे डॉक्टरांनी तिचे सिटी स्कॅन केले. या सीटी स्कॅनच्या रिपोर्ट पाहिल्यावर डॉक्टरांच्या पायाखालील जमीन सरकली. रिपोर्टमध्ये पोटात काहीतरी असल्याचे दिसत होते. त्यामुळे वेदन होत होत्या. अखेर डॉक्टरांनी पुन्हा ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. ऑपरेशन केल्यावर महिलेच्या पोटातून टॉवेल काढण्यात आला. हा टॉवेल ऑपरेशन करताना वापरला जातो. महिलेची प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच पोटात टॉवेल विसरणाऱ्या डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.