नाव मोठं लक्षण खोटं! कोरोनाच्या काळात ‘या’ राज्यात धान्यवाटपाची यंत्रणा उभारण्यात सरकारला अपयश

लोकांना लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला. अनेक महिने लोकांना घरातच रहावं लागलं. प्रवासी मजुरांना तर चालत घर गाठावं लागलं. गुजरातमध्ये (Gujrat) झालेल्या या सर्व्हेमध्ये (Survey) धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.

कोरोनाला (Corona Virus) रोखण्यासाठी  देशात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन (Lockdown)  केल्यानंतर अनेक अडचणींचा सामना लोकांना करावा लागला. आधीच बिकट परिस्थितीचा सामना करणाऱ्या लोकांना लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला. अनेक महिने लोकांना घरातच रहावं लागलं. प्रवासी मजुरांना तर चालत घर गाठावं लागलं. गुजरातमध्ये (Gujarat) झालेल्या या सर्व्हेमध्ये (Survey) धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.

सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात केलेल्या या सर्व्हेनुसार जवळपास ९ टक्के लोकांना अनेकदा जेवण मिळालं नाही तर २० टक्के लोकांना कोरोनाच्या संकटकाळात योग्य अन्न मिळालं नाही. यापेक्षा भयावह अशी परिस्थिती काही लोकांवर आली. २१.८ टक्के घरांमध्ये एक वेळचं अन्नही शिजलं नसल्याची माहिती सर्व्हेमधून समोर आली आहे.

गुजरातमधील ९ जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. यात अहमदाबाद, आणंद, भरूच, भावनगर, दाहोद, मोरबी, नर्मदा, पंचमहल आणि वडोदरा या जिल्ह्यांचा समावेश होता. सर्व्हे करणारी संस्था ANANDI च्या संस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व्हे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झाला होता.

सर्व्हेच्या माध्यमातून असाही सल्ला देण्यात आला की, अन्न सुरक्षा अधिकार अभियाना अंतर्गत डिस्ट्रिब्यूशन सिस्टिम आणखी चांगली करण्याची गरज आहे. यामध्ये कोरोना किंवा आपत्तीच्या काळात जास्ती जास्त फायदा मिळू शकेल.