ह्रदयद्रावक घटना…वडील तुरूंगात, आईनं दिलं सोडून आणि डोक्यावरच्या मायेचा आधारच हरपला

सोशल मीडियावर (Social Media)  विविध प्रकारच्या घटना व्हायरल होत असतात. परंतु एका रस्त्यावर आलेल्या मुलाची हृदयद्रावक कहाणी आणि फोटो (Photo Viral) सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेश : आई (Mom) आणि बाबा (Dad)  हे दोघे असे दैवत आहेत.की ज्यांच्या आधारामुळे आणि मायेमुळे आपल्या जीवनात मायेचा सागर ओसांडू लागतो. परंतु त्यांच्या आधाराविना तोच सागर डोळ्यांतून वाहू लागतो. सोशल मीडियावर (Social Media)  विविध प्रकारच्या घटना व्हायरल होत असतात. परंतु एका रस्त्यावर आलेल्या मुलाची हृदयद्रावक कहाणी आणि फोटो (Photo Viral) सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

श्वानासोबत रस्त्यावर झोपलेल्या मुलाचा फोटो उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगरमध्ये असलेल्या जनपदमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्वानासोबत (Dog) रस्त्यावर झोपलेला मुलाचं नाव अंकित (Ankit) आहे. तो दहा वर्षांचा असल्यामुळे तो नक्की कुठे राहतो किंवा आपल्या नातेवाईकांविषयी त्याला काहीही माहिती नाहीये. परंतु त्याचे वडील तुरूंगात आहेत आणि आई मला सोडून गेली. असं अंकितने पोलिसांना सांगितलं. अंकित एका चहाच्या टपरीवर काम करतो. त्यावरच तो उदरनिर्वाह करतोय. त्याच्यासोबत असलेल्या श्वानाचं नाव डॅनी आहे. अंकित जे पैसे कमावतो त्या पैशातून तो स्वत:चे आणि डॅनीचे पोट भरतो.

मुझफ्फरपूरमध्ये सध्या कडाक्याची थंडी वाढली आहे. शहरातील शिव चौकातील एका दुकानासमोर हा मुलगा त्याचा मित्र बनलेल्या श्वानासोबत राहतो. त्याचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जनपदचे पोलीस अधीक्षक अभिषेक यादव यांनी मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. तसेच या मुलाला आता महिला व बाल विकास विभागाकडे सोपवण्यात आलं आहे.

अंकित ज्या दुकानामध्ये काम करत होता. त्या दुकानातील मालिकाने सांगितलं की, अंकित जेव्हा दुकानात काम करायचा, तेव्हा त्याचा मित्र डॅनी एका कोपऱ्यात उभा रहायचा. अंकित एक मेहनती आणि स्वाभिमानी मुलगा आहे. कारण तो फुकटमध्ये काहीही खात किंवा घेत नसे आणि श्वानाला सुद्धा दूध फुकटमध्ये देत नव्हता.

या रस्त्यावर आलेल्या मुलाने सगळ्यांना एक चांगलीच शिकवण दिली आहे. ती म्हणजे जीवनात कितीही वाईट प्रसंग आले तरी, या प्रसंगावर मात करत नेहमी पुढे जायला शिका.