प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

ओडिशाच्या तुरुंगात बंद कैद्यांना लवकरच दर रविवारी देशभक्ती व प्रेरणादायी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तुरुंग महासंचालक एस.के. उपाध्याय यांनी सांगितले की, कैद्यांना 'ओडिशा मॉडेल जेल म्यॅन्युअल-2020' च्या अंतर्गत सुविधा देण्यात येत आहे. यापूर्वी विशेष तुरुंगाच्या कैद्यांना चित्रपट पाहण्याची सुविधा देण्यात येत होते.

  • ओडिशा मॉडेल जेल मॅन्युअल अंतर्गत कैद्यांना मिळणार सुविधा

भुवनेश्वर(Bhuvaneshwar). ओडिशाच्या तुरुंगात बंद कैद्यांना लवकरच दर रविवारी देशभक्ती व प्रेरणादायी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तुरुंग महासंचालक एस.के. उपाध्याय यांनी सांगितले की, कैद्यांना ‘ओडिशा मॉडेल जेल म्यॅन्युअल-2020’ च्या अंतर्गत सुविधा देण्यात येत आहे. यापूर्वी विशेष तुरुंगाच्या कैद्यांना चित्रपट पाहण्याची सुविधा देण्यात येत होते.

ओडिशामध्ये एकूण 91 कारागृह असून सध्याच्या परिस्थितीत तिथे 8,000 कैदी आहेत. विशेष जेलचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कैद्यांच्या मनोरंजनासाठी 100 बैठकीची क्षमता असणाऱ्या एका खोलीत मोठी स्क्रीन व एक साऊंड सिस्टिमसोबत प्रोजेक्टर लावण्यात आला आहे. याचबरोबर कैद्यांची चिंता व तणाव कमी करण्यासाठी सुखदायक भक्ती व अध्यात्मिक गाणे लावण्यात येतील.

कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले की, कैद्यांना तणावमुक्त करण्यासाठी देशभक्ती व प्रेरक चित्रपट प्रत्येक रविवारी दाखविण्यात येतील. आरोग्य, मानव अधिकार, कायदेशीर मदत व अन्य मुद्यांवर कैद्यांसाठी जागरूकता कार्यक्रम दाखविण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक कैदी तणावामुळे आत्महत्या करतात. याच कारणामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने तुरुंगात सुखदायक संगीत वाजविण्याचा सल्ला दिला.