मच्छिमारांच्या मुलीची आकाशात भरारी ; २३ वर्षी बनली केरळातील पहिली व्यावसायिक पायलट

राज्यातली पहिल्या व्यावसायिक महिला पायलट बनून केरळ (Kerala) राज्यात त्यांनी इतिहास रचला आहे. त्यामुळे जेनी यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सह-वैमानिकाची (co-pilot)भूमिका साकारण्यासाठी उड्डाणाची तयारी करता असताना जेनी यांना सोशल मीडियावरूनही प्रेम आणि पाठिंबा मिळाला.

    तिरुअनंतपुर: लहानपणी आकाशातून उडणारी विमाने पाहणे अनेकांचा आवडता छंद असतो. मात्र असेच विमान आपणही एका दिवस उडवू असे म्हटले तर कदाचित त्यावेळी ते काहीसे हास्यास्पद वाटते. पण हेच स्वप्न खरे झाले तर आकाशही ठेंगणे वाटवू लागते. असाच काहीसा प्रकार तिरुअनंतपुरममधील
    २३ वर्षांच्या जेनी जेरोम यांच्या सोबत घडला आहे. तिरुअनंतपुरममधील किनारपट्टीवर वसलेल्या अनेक खेड्यांपैकी एक असलेल्या कोचुथुरा( Kochuthura)गावातील जेनी जेरोम यांना जेव्हा Air Arabia G9 449 साठी शारजा ते तिरुअनंतपुरम ( Thiruvananthapuram ) उड्डाणासाठी को-पायलट ( Co-pilot ) म्हणून निवड झाल्याचे समजले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. लहानपणापासूनच त्यांना उडण्याची आवड होती. त्यांचं हे स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आहे.

    त्या राज्यातली पहिल्या व्यावसायिक महिला पायलट बनून केरळ (Kerala) राज्यात त्यांनी इतिहास रचला आहे. त्यामुळे जेनी यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सह-वैमानिकाची (co-pilot)भूमिका साकारण्यासाठी उड्डाणाची तयारी करता असताना जेनी यांना सोशल मीडियावरूनही प्रेम आणि पाठिंबा मिळाला.

    कॉंग्रेसचे नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी सर्वात प्रथम जेनीला पहिल्या व्यावसायिक विमान उड्डाणासाठी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर खासदार शशी थरुर यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले अन अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

    “कोचुथुराकडून सह-पायलट म्हणून पहिल्यांदा विमान उड्डाण करणाऱ्या जेनी जेरोम याचं अभिनंदन. आज त्या @aiararabiagroup फ्लाइट SHJ ते TRV उडवणार आहे, एका लहानशा मच्छिमारांच्या खेड्यातून आलेल्या एक मुलीचं व्यावसायिक पायलट होण्याचं बालपणीचं स्वप्न आज साकार झालं. त्यांची कहाणी खरंच प्रेरणादायी आहे!” अशा शब्दात थरूर यांनी जेनी यांचं कोतुक केलं आहे.