अंत्यसंस्कार करण्यात आलेली मुलगी आमची नाही, हाथरस घटनेतील पीडित कुटुंबाचा धक्कादायक दावा

पिडीतेच्या कुटुंबाने हाथरसरचे जिल्हाधिकारी प्रवीण लक्षकार यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. प्रवीण लक्षकार यांनी पिडीतेच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली असल्याचे सांगितले गेले आणि त्यांचे फोनही हिसकावून घेतले आहेत.

उत्तरप्रदेश : हाथरस सामूहिक बलात्कार (Hathras gang rape)आणि हत्येच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारवर दबाव वाढल्यानंतर आता गावात मीडियाला मीडियाला जाण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी पीडित कुटुंबांचा आक्रोश हृदय हेलावणारा होता. या प्रकरणात उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेल्या कृत्याबाबत देशात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. पीडित कुटुंबाने दावा  ( shocking claim) केला आहे की, पोलिसांनी ज्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेत ती आमची मुलगी नव्हतीच. (The girl who was cremated is not ours) या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.

तसेच राज्य सरकारने गठन केलेल्या एसआयटी यंत्रणेवर आमचा विश्वास नाही. किंवा सीबीआयवरही आमचा विश्वास नाही. असे कुटुंबाने म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांवरही कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

पीडितेच्या कुटुंबाने हाथरसरचे जिल्हाधिकारी प्रवीण लक्षकार यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. प्रवीण लक्षकार यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली असल्याचे सांगितले गेले आणि त्यांचे फोनही हिसकावून घेतले आहेत.

पीडितेच्या भावाने पोलिसांचा पहारा चुकवून माध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला होता. शेतातून लपत-छपत हा मुलगा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींना येऊन भेटला होता. यावेळी त्याने धक्कादायक माहित दिली. त्याने सांगितले की, आमच्याकडून पोलिसांनी मोबाईल फोन हिसाकावून घेतले. घरातून कुणालाही बाहेर येण्यास सक्त मनाई केली आहे. याला विरोध केला असता जिल्हाधिकारी प्रवीण लक्षकार यांनी वडिलांना लाथ मारली होती. त्यामुळे ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर सर्वांन घरात बंद करण्यात आले.