मुलींनीच आईच्या डोक्यावर वार करून केली तिची हत्या आणि पुढे उचललं टोकाचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, विमला देवा उर्फ विमलेश आपल्या दोन मुलींसह 24 वर्षीय ममता आणि 20 वर्षीय रेणू यांच्यासोबत एकाच घरात राहत होती. तिचा वती वेदराम रजावली पोलीस चौकीजवळ वेगळं राहत होता. तो मजुरी करतो. त्यांची तीनही मुलं वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. शनिवारी सायंकाळी त्यांच्या घरातून कुजलेला वास येऊ लागल्याने गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

    फिरोजाबाद: उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे आईसोबत वेगळ्या घरात राहणाऱ्या दोन मुलींनी अत्यंत भयावह कृत्य केलं आहे. या दोघींनी आईच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली. यानंतर आईच्या साडीने मुलींनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेवटी चार दिवसांनंतर पोलिसांनी दरवाजा तोडून तीनही मृतदेह बाहेर काढले.

    मिळालेल्या माहितीनुसार, विमला देवा उर्फ विमलेश आपल्या दोन मुलींसह 24 वर्षीय ममता आणि 20 वर्षीय रेणू यांच्यासोबत एकाच घरात राहत होती. तिचा वती वेदराम रजावली पोलीस चौकीजवळ वेगळं राहत होता. तो मजुरी करतो. त्यांची तीनही मुलं वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. शनिवारी सायंकाळी त्यांच्या घरातून कुजलेला वास येऊ लागल्याने गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

    स्थानिकांकडून माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  घरामधील दृश्य पाहून सर्वजण हैराण झाले. जमिनीवर महिलेचा मृतदेह होता तर दोन्ही मुली वर लटकत होत्या. मृतदेहांमधून दुर्गंधी येत होती. महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याचं दिसत होतं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांचे मृतदेह तब्बल चार दिवसांपासून पडून असल्याचं दिसत आहे.