केरळच्या राज्यपालांनी केला शिव मंदिरात पूजा व रूद्राभिषेक

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे उत्तर प्रदेशशी विशेष असे नाते आहे.तिहेरी तलाकविरोधात आवाज बुलंद करण्यात त्यांचे नाव अग्रक्रमावर आहे. या कायद्यावरून त्यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमने उधळली होती. तसेही शाह बानो प्रकरणापासूनच ते चर्चेत आले होते. या प्रकरणानंतर मुस्लीम महिलांच्या अधिकारांसाठी त्यांनी लढा दिला होता.

    आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे उत्तर प्रदेशशी विशेष असे नाते आहे. विशेष म्हणजे शाह बानो आणि तिहेरी तलाकच्या मुद्यावर स्पष्ट मते व्यक्त केल्यानंतर आता त्यांनी बहराईच येथे शिव मंदिरात पूजा केली व रूद्राभिषेकही केल्याने कट्टरपंथियांचे लक्ष्य ठरण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे त्यांनी बहराईच येथून दोनवेळा खासदारकीही गाजविली आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या खान यांनी सिद्धनाथ महामदेव मंदिरात रूद्राभिषेक केला. यावेळी सिद्थनाथ पीठाधीश्वर महामंडलेश्वर रवि गिरी महाराजही यावेळी उपस्थित होते.

    वादग्रस्त मुद्यांवर परखड मते
    देशातील तिहेरी तलाकविरोधात आवाज बुलंद करण्यात त्यांचे नाव अग्रक्रमावर आहे. या कायद्यावरून त्यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमने उधळली होती. तसेही शाह बानो प्रकरणापासूनच ते चर्चेत आले होते. या प्रकरणानंतर मुस्लीम महिलांच्या अधिकारांसाठी त्यांनी लढा दिला होता. एक दिवस देशातील मुस्लीम महिलांना त्यांचे अधिकार मिळतील अशी आशा व्यक्त करतानाच खुदाकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला असेही ते म्हणाले होते.